कॉर्नेल वेस्ट : ‘‘आंतरराष्ट्रीयत्व’ हा आरंभ बिंदू आहे. त्यामुळे आपली ऐतिहासिक, संरचनात्मक आणि मनोविश्लेषणात्मक समज वाढीला लागते. जगभरात कोणत्या शक्तींचं प्राबल्य आहे, हे कळून येतं.”
आजघडीला ‘राष्ट्रवाद’ हा विचार रुजवला जातोय. तो आपल्या घरापर्यंत पोचला आहे. आपल्या विचारात रुजलाय. या राष्ट्रवादाने हिंसाचाराला जन्म दिलाय आणि त्याने सरकारच्या यंत्रणेवर मक्तेदारी मिळवलीय. त्याचा आपल्या रोजच्या जीवनातही प्रवेश झालाय. राष्ट्रवाद हा माझ्यासाठी एक अडथळा आहे. त्यामुळे एक देश दुसऱ्या देशाशी जोडला गेलेला असतो वा एका साम्राज्याची नाळ दुसऱ्या साम्राज्याशी जोडलेली असते, हे आपल्याला समजून येत नाही.......